breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

CBSE परीक्षा ऑनलाइन घेण्यास नकार; लेखी परीक्षा होणार

नवी दिल्ली – देशात कोरोना व्हायरस या महामारीचा मोठा फटका विद्यार्थ्यांच्या परीक्षांना बसत आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येमुळे १० वी आणि १२वीच्या परीक्षा रद्द होणार असल्याच्या चर्चा सर्वदूर पसरत होत्या. आता मात्र CBSEने या सर्व चर्चांचा पूर्णविराम दिला आहे. CBSE बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे परीक्षा ऑनलाईन होणार नसून लिखीत स्वरूपात होणार असल्याचं बोर्ड अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे.

परीक्षा नक्की कधीपासून सुरू होतील यावर सध्या चर्चा सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत लेखी परीक्षा घेतल्या जातील असं वक्तव्य केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी केलं. शिवाय यासंबंधी १० डिसेंबर रोजी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी पोखरियाल बोलणार आहेत.

दरम्यान, २०२१ या वर्षातील १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. परीक्षांचे वेळापत्रक cbse.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button