breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुण्यात आज आज पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता

पुणे : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. पुणे व परिसरात हवामान विभागाने आज व उद्या हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ‘येलो’ अलर्ट जारी केला आहे.

राज्यातील हवामानात बदल झाला असल्याने विजांचा कडकडाट होणार नाही, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या व मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे. पुण्यातील वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

राज्यात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर जळगावमध्ये तुफान पाऊस झाला असून पुढचे काही दिवसही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, नंदूरबार, अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढचे २४ तास या जिल्ह्यांसाठी महत्वाचे असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button