TOP Newsपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पोलीस भरती प्रक्रियेत गैरव्यवहार केल्या प्रकरणी सात उमेदवारांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड पोलीस भरती प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी सात उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 19 नोव्हेंबर 2021 5 जानेवारी 2022 या कालावधीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरात घडला.

अर्जुन छोटीराम जारवाल, प्रताप मोहन सुलाने, जगदीश पन्नूगुसिंगे, रणजीतसिंग मदनसिंग महेर, सचिन विष्णू गुसिंगे, सुरेश वाल्मिक गोमलाडू, संदीप रेवप्पा होवाळे अशी गुन्हा दाखल झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. पिंपरी चिंचवड भरती सेलचे पोलीस उपनिरीक्षक संदीप खलाटे यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात पोलीस शिपाई पदासाठी 720 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी नोव्हेंबर2021 मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर पुणे येथे मैदानी चाचणी आणि नंतर कागदपत्र पडताळणी आणि अन्य प्रक्रिया पार पडली. नुकताच या पोलीस भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्या उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस भरती दरम्यान लेखी परीक्षा क्रमांक, चेस्ट नंबर असलेले उमेदवार आरोपी अर्जुन छोटीराम जारवाल, प्रताप मोहन सुलाने, जगदीश पन्नूगुसिंगे, रणजीतसिंग मदनसिंग महेर, सचिन विष्णू गुसिंगे, सुरेश वाल्मिक गोमलाडू, संदीप रेवप्पा होवाळे यांनी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार केला. यातून त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे. याबाबत पडताळणी समितीने देखील अहवाल दिला असून त्यात आरोपींनी गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याचे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button