breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत संघटनात्मक खांदेपालट? पार्थ पवार यांची भूमिका निर्णायक!

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

नवा चेहरा मैदानात उतरवणार, भाजपासमोर आव्हान ठेवणार

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्थानिक पातळीवर संघटनात्मक खांदेपालट करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. या निर्णय प्रक्रियेत युवा नेते पार्थ पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाने संघटनात्मक मोर्चेबांधणी तगडी केली आहे. त्याला तोडीस तोड विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला तयारी करावी लागणार आहे.

दरम्यान, नुकतेच झालेल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडणुकीत युवा नेते पार्थ पवार यांचे समर्थक असलेल्या राजू मिसाळ यांना संधी देण्यात आली. वास्तविक, पार्थ यांच्या शिफारशीनेच ही निवड झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची पदे देताना पार्थ पवार यांच्या ‘गुड बॉक्स’ मधील नवोदितांना संधी मिळेल, अशी शक्यता आहे.

तत्पूर्वी, पार्थ यांचे निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील गव्हाणे यांना विद्यार्थी सेलचा प्रदेशाध्यक्ष म्हणून बढती दिली होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात पार्थ पवार यांचे ‘पर्व’ सुरू झाल्याची वस्तुस्थिती आहे. आता शहर पातळीवर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या विचारांशी जुळवून घेणारा निष्ठावंत चेहरा पक्षाला समोर आणावा लागणार आहे.

‘मावळ’चा गड जिंकण्यासाठी पार्थ पवारांची कसोटी…

२०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव पवार कुटुंबियांच्या जिव्हारी लागला आहे. याच मतदार संघात पिंपरी आणि चिंचवड हे दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या दोन्ही मतदार  संघात पार्थ पवार मतांच्या आकडेवारीत पिछाडीवर राहीले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पार्थ यांना पिंपरी आणि चिंचवडमध्ये रस्त्यावर उतरुन काम करावे लागले. जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणून स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे आगामी २०२४ मध्ये निवडणुकीत पूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा काढता येणार आहे. त्यासाठी पार्थ पवार संघटनात्मक आघाडीवर आपल्या फळीतील चेहऱ्यांना संधी देतील, यात शंका नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button