breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

लॉकडाउनबद्दल सांगता येणार नाही, लोकांचे जीव वाचवणं महत्वाचं- आदित्य ठाकरे

मुंबई -कोरोनाचे रुग्ण वाढत गेल्याने राज्यात लॉक डाउन पुकारण्यात आला होता. हा लॉक डाउन आता 1 जूनपर्यंत वाढवण्यात आलाय. मात्र 1 जूननंतर लॉक डाउन उठणार का असा प्रश्न सतत विचारला जात आहे. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रोखठोक मत दिलं आहे. लॉकडाऊन आपल्याला हळूहळू उघडावे लागेल. कोरोना स्थिती पाहून निर्णय होईल. लसीचा जसा पुरवठा होतो तसं लसीकरण आपण करतोय. चिंतेत राहू नका , गर्दी करू नका, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.

लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. मागच्यावेळी लॉकडाऊन हटवल्यानंतर आकडे अचानक वाढले. आता आकडे जरी कमी असले तरी लगेचच सर्व काही सुरु होणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईतले आकडे आटोक्यात आले आहेत असं वाटत असलं तरी आम्ही ते पूर्ण कसे घटतील याकडे लक्ष देतोय. अजूनही 1300 ते 1400 केसेस आहेत त्यामुळे त्या केसेस पूर्ण कमी करण्याकडे आमचं लक्ष आहे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

लॉकडाऊनबद्दल आताच काही सांगू शकत नाही. लोकांचे जीव वाचवणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. मागच्या वेळी लॉकडाऊन थोडा उगडला तेव्हा 11 हजार च्या आसपास केसेस गेल्या होत्या. त्यामुळे यावेळी काळजी घेणं गरजेचं आहे. लॉकडाऊनबद्दल आताच काही सांगू शकत नाही पण लगेचच सगळं काही उघडणार नाही हे निश्चित आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

लसीकरणाचा मेगा प्लॅन
लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय आहे. प्रत्येक राज्याची मागणी आहे की आम्हाला जास्तीत जास्त लस द्या, तशी आमचीही आहे पण जसजशी लस उपलब्ध होतेय तसं लसीकरण केलं जातंय. महाराष्ट्राने आतापर्यंत सगळ्यात जास्त लसी दिलेल्या आहेत. काही गावं तर अशी आहेत की पूर्णपणे लसीकरण झालेलं आहे. संभाजीनगर परिसरात अशी दोन गावे आहेत.

मुंबईत 227 लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु आहे. ड्राईव्ह इन लसीकरण सेंटर सुद्धा सुरू आहेत. जेवढ्या लसी लवकर येतील तेवढं लसीकरण होईल. ग्लोबल टेंडरबाबत महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातल्या लसी बाहेर गेल्या नसत्या तर लसीकरण जास्त झालं असतं या जर तरच्या गोष्टी आहेत. मुंबई उपनगरचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर मुंबईत जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याची जबाबदारी आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आपण 7 दिवसात मुंबईतील संपूर्ण लसीकरण करु. भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत असतं त्यांना ते करू द्या, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button