breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

CAIT कडून चीनी मालावर बहिष्कार

गलवाण खोऱ्यात भारत-चीन लष्करात झटापट झाली. यात भारताचे 20 सैनिक शहीद झाले. चीनकडील बाजूसही मोठी हानी झाली असून, चीनच्या मृत्यू आणि जखमी झालेल्या सैनिकांची संख्या 40 असल्याचे समजते. दरम्यान, उभय देशांचे लष्करी संबंध ताणले गेले असताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation of All India Traders) अर्थात कैट (CAIT) न एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कैटने चीनच्या आगळिकीचा निशेध केला आहे. तसेच, चीनी मालांवर बहिष्कार घालण्याचे अवाहनही व्यापाऱ्यांना केले आहे.

सीएआयटीने म्हटले आहे की, 13 अरब डॉलर म्हणजेच सुमारे 1 लाख कोटी रुपयांपर्यंतची चीनी बनावटीच्या वस्तींची आयात डिसेंबर 2021 मध्ये घटवण्यात यावी. भारतात आज घडीला प्रतिवर्ष 5.25 लाख कोटी रुपये म्हणजेच साधारण 70 अब्ज डॉलर किमतीच्या चीनी वस्तू आयात होतात.

सीएआयटीने एका प्रतिक्रियेत सांगीतले की, पहिल्या टप्प्यात सीएआयटीने वस्तुंच्या 500 पेक्षाही अधिक श्रेणी निवडल्या आहेत. ज्यात 3,000 पेक्षाही अधिक वस्तूंचा समावेश आहे. ज्या भारतातही बनवल्या जातात परंतू स्वस्ताईच्या नावाखाली चिनमधून आयात केल्या जातात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button