breaking-newsराष्ट्रिय

CAA : हिंदू सेनेच्या इशाऱ्यानंतर शाहीन बागमध्ये जमावबंदीचा आदेश

नवी दिल्ली | महाईन्यूज

सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात शाहीन बागेत गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. शाहीन बाग परिसरात रविवारी (1 मार्च) जमावबंदीचे कलम 144 हे लागू करण्यात आले आहे. दिल्लीपोलिसांनी शाहीन बाग परिसरात कोणीही एकत्र जमू नये, तसेच कोणीही आंदोलन करू नये असं नोटीशीतून बजावले आहे. तसेच हा आदेश न मानल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हिंदू सेनेने ट्विट करून 1 मार्च म्हणजेच रविवारी शाहीन बागेत आंदोलन करणाऱ्यांना हटवण्यात येईल असं म्हटलं होतं. त्यानंतर शाहीन बागेत मोठ्या संख्यने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांनी आपले आंदोलन आता थांबवावे असे आवाहनही पोलिसांनी आंदोलकांना केलं आहे. पोलिसांनी शाहीन बाग परिसराला बॅरिकेड्सनी वेढले आहे. तसेच येथे कलम 144 लागू करण्यात आल्याने आता आंदोलन करण्याची कोणालाही परवानगी नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button