breaking-newsमुंबई

वडापावच्या नादात अडीच लाखाला गंडा

मुंबई | महाईन्यूज

वडापाव खाणे एका इसमाला महागात पडले असून वडापाव खाण्याच्या नादात त्याने आपल्या गाडीतील अडीच लाख रुपये गमावले आहेत. पालघर शहरात भोलानाथ वडापाव सेंटरनजीक गाडी रस्त्याच्या कडेला लावून वडापाव खायला गेलेल्या सातपाटीच्या या इसमाच्या गाडीतून तब्बल अडीच लाखांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. पालघर मधील विविध बँकांमध्ये पैसे काढून आणल्यानंतर हे पैसे या इसमाने आपल्या गाडीतील बागेत ठेवले व गाडी रस्त्याच्या कडेला लावून वडापाव खाण्यासाठी गेला. ही संधी साधत अज्ञातांनी गाडीच्या पुढील बाजुचा दरवाजा तोडून पैशाने भरलेली बॅग लांबवली. तसेच गाडीच्या चाकाची हवाही काढलेली आहे.

शहरातील माहीम रस्ता स्थित असलेल्या कुबेर शॉपिंग सेंटरकडे एका लेबर कॉन्ट्रॅक्टरने आपली गाडी लावून तो काही कामानिमित्त बाहेर गेला. यादरम्यान काही अज्ञातांनी गाडीच्या पुढची काच तोडून गाडीत पैसे असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. मंगळवारी संबंधितांनी पालघर शहरातील दोन बँकांमधून पैसे काढले व ते पैसे त्यांनी आपल्या एका लहान बॅगेत ठेवले. त्यानंतर त्यांना काही काम असल्याने त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला लावून ते निघून गेले. याचदरम्यान अज्ञातांनी गाडीच्या डाव्या बाजूची पुढील काच फोडून त्यावाटे पैशांची बॅग लंपास केली. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button