Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा फटका! अदानी ते अंबानींपर्यंत… भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत तब्बल ‘एवढी’ घट

Share Market Crash : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यावर त्यांनी आयात शुल्कात (टॅरिफ) केलेल्या वाढीचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. याचा थेट फटका भारतासह जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीलाही बसला आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत एकूण 10.3 अब्ज डॉलर इतकी घट झाली आहे.

‘फोर्ब्स’ मासिकाच्या ताज्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक नुकसान मुकेश अंबानी यांना झाले असून, त्यांच्या संपत्तीत 3.6 अब्ज डॉलर इतकी घट झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती 87.70 अब्ज डॉलर इतकी राहिली आहे.

गौतम अदानी यांच्या संपत्तीत 3 अब्ज डॉलर घट होऊन ती 57.3 अब्ज डॉलर झाली आहे. सावित्री जिंदल आणि कुटुंबीयांच्या संपत्तीत 2.2 अब्ज घसरण झाली असून, त्यांची संपत्ती आता 33.9 अब्ज डॉलर आहे. तसेच, शिव नाडर यांना 1.5 अब्ज डॉलरचा तोटा झाल्याचे नोंदवले गेले असून, त्यांची संपत्ती 30.90 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

वॉल स्ट्रीटवरही मोठा फटका, 8 ट्रिलियन डॉलरचे नुकसान

ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीमुळे अमेरिकेतील शेअर बाजारही हादरला असून, वॉल स्ट्रीटवर 8 ट्रिलियन डॉलरहून अधिक संपत्तीचे नुकसान झाले आहे. यातील तब्बल 5 ट्रिलियन डॉलरचे नुकसान केवळ गेल्या 2 ट्रेडिंग सत्रांमध्ये झाले आहे. गेल्या 100 वर्षांतील ही सर्वात मोठी टॅरिफ वाढ मानली जात आहे.

हेही वाचा –  मानसी घोष ठरली ‘इंडियन आयडल 15’ची विजेती: 25 लाखांसह चमचमती ट्रॉफी जिंकली!

जगभरातील अब्जाधीश देखील तोट्यात; फक्त बफे फायदेशीर

इलॉन मस्क (टेस्ला, स्पेसएक्स) – 130 अब्ज डॉलर घट (संपत्ती: 302 अब्ज डॉलर)

जेफ बेझोस (अमेझॉन) – 45.2 अब्ज डॉलर घट (संपत्ती: 193 अब्ज डॉलर)

मार्क झुकरबर्ग (मेटा) – 28.1 अब्ज डॉलर घट (संपत्ती: 179 अब्ज डॉलर)

बर्नार्ड अर्नाल्ट (LVMH) – 18.6 अब्ज डॉलर घट (संपत्ती: 158 अब्ज डॉलर)

बिल गेट्स – 3.38 अब्ज डॉलर घट (संपत्ती: 155 अब्ज डॉलर)

फक्त प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे हे अपवाद ठरले असून, इतर सगळ्या प्रमुख उद्योगपतींच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे: वॉरेन बफे यांच्या संपत्तीत मात्र यंदा 12.7 अब्ज डॉलरची वाढ झाली असून, त्यांची संपत्ती सध्या 155 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button