मुंबई मेट्रो मार्ग – ३ दुसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी
मुंबई मेट्रो मार्ग क्रमाक तीनच्या प्रवाशांना दर ३ मिनिटांनी ट्रेनची सुविधा
मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे वैतागलेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो मार्ग – ३ ( कुलाबा-वांद्र – सीप्झ ) सुरु होण्याची वाट पाहणाऱ्या आता लवकरच भूयारी मेट्रोचा संपूर्ण मार्ग प्रवासासाठी उपलब्ध होणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग – ३ दुसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी झाली आहे. आता लवकरच मार्गावरील भूयारी मेट्रो धावणार आहे.
दर तीन मिनिटांना ट्रेन मिळणार
मुंबई मेट्रो मार्ग क्रमाक तीनच्या प्रवाशांना आता दर ३ मिनिटांनी ट्रेनची सुविधा मिळणार आहे. मुंबई मेट्रो मार्गिका – ३ ची ट्रायल रन शहरातील सर्वात वर्दळीच्या भागात झाली आहे. या मार्गावरुन रोज लाखो लोकांचा प्रवास होत असतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की ही सिस्टीम संपूर्ण सुरक्षित असून इको फ्रेंडली आहे. लवकरच या भूयारी मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.
मुंबईतील दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरात या मेट्रोमुळे आता लवकर वातानुकूलित मेट्रोतून पोहचता येणार आहे. मुंबईतील ज्या भागात रेल्वेची स्थानके नाहीत अशा मार्गात मेट्रो तीन मार्गिकेची स्थानके उभारण्यात आली आहेत. त्यामुळे रस्ते मार्गावरील वाहनांपेक्षा भूयारी मेट्रोतीन लवकर कार्यालय ते घर गाठता येणार आहे. त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
Mumbai Metro Line-3 च्या प्रवाशांना मिळणार या सुविधा
⦁ कनेक्टिविटी: कुलाबा ते सीप्झ या मार्गावरील ही मेट्रो लाईन वांद्रे , कुर्ला आणि एअरपोर्ट सारख्या महत्वाच्या ठिकाणांना जोडली जाणार आहे.
⦁ फ्रीक्वेंसी: दर तीन मिनिटांना एक ट्रेन असणार आहे.त्यामुळे फारसी वाट पाहावी लागणार नाही.
⦁ प्रवाशांच्या वेळेत बचत : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते सीप्झचा प्रवास रस्ते मार्गाने ६० ते ७० मिनिटांचा आहे. हा प्रवास आता केवळ २५ मिनिटात पूर्ण होणार आहे.
⦁ गर्दीचे नियोजन : उपनगरीय लोकल ट्रेन आणि BEST च्या बसेसची गर्दी कमी होण्यास मदत होईल.
Mumbai च्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग
मुंबईकरांना आता तासनतास ट्रॅफीक जाममध्ये अडकावे लागणार नाही.लोकांना कमी पैशात वातानुकूलीत प्रवास घडणार आहे. एअर कंडीशन कोच आणि आधुनिक इंन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा होईल.
मेट्रो मार्गिका -3 ही आशियातील सर्वात आधुनिक अंडरग्राऊंड मेट्रो मार्गिका म्हटले जात आहे. मुंबई मेट्रो मार्गिका – 3 ची यशस्वी चाचणी वाहतूक व्यवस्थेत क्रांती आणणार आहे. तर तीन मिनिटांना ट्रेन सुटणार असल्याने केवल उपनगरीय लोकलच नव्हे तर रस्त्यावरील वाहनांची गर्दीही घटणार आहे. मुंबईकरांचे जीवनमानच आता मेट्रो तीन या मार्गिकेने बदलणार आहे.





