उद्योगांमध्ये ऊर्जा बचतीचे उलगडले अनेक पर्याय!
उद्योग विश्व: क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे शाखेच्या वतीने “ऊर्जा संरक्षण स्पर्धा २०२५ ” संपन्न

केसस्टडी सादरीकरण, घोषवाक्य व पोस्टर स्पर्धेतून स्पर्धकांनी मांडले ऊर्जा बचतीचे उपाय
पिंपरी चिंचवड : क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे शाखेच्या वतीने “ऊर्जा संरक्षण स्पर्धा २०२५ ” संपन्न झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून उद्योग विश्वामध्ये ऊर्जा बचतीचे पर्याय वापरले जावेत त्या माध्यमातून जागतिक स्तरावर ऊर्जा बचत केली जाईल या उद्देशाने स्पर्धकांकडून केस स्टडीचे सादरीकरण घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धा घेण्यात आले. या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला.
ऊर्जा सेवांचा कमी वापर करून किंवा ऊर्जा अधिक कार्यक्षमतेने वापरून ऊर्जा संरक्षणासाठी जागतिक स्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. अशा प्रयत्नांचा उद्देश म्हणजे एकूण ऊर्जा वापरात कपात करणे.उद्योगांनी या दिशेने अधिक प्रयत्न करावेत यासाठी, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया ( क्यू.सी.एफ.आय ) पुणे शाखेच्या वतीने “ऊर्जा संरक्षण स्पर्धा २०२५” या विषयावर स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत केस स्टडीचे सादरीकरण, घोषवाक्य व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सहभागी स्पर्धकांनी पारंपारीक उर्जे ऐवजी सोलर , पवनचक्की आदी पर्यायी ऊर्जा स्तोत्राचा वापर कसा करता येवू शकतो याबाबतीत केस स्टडी सादरीकरणात आपली मनोगते मांडली.
हेही वाचा – पिंपरी महापालिकेचे कामकाज शंभर टक्के झाले डिजिटल
सदर स्पर्धा हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यात आली. क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर भोसरीयेथे प्रत्यक्ष सादरीकरण पार पडले. २ जून रोजी हेच प्रात्यक्षिक ऑनलाइन सादरीकरण होणार आहे.या स्पर्धात २२ संस्थांमधून १५१ सहभागी उपस्थित होते. केस स्टडी, घोषवाक्य व पोस्टर या श्रेणींत ७२ नामांकन प्राप्त झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे क्यूसीएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश मिश्रा, विशेष अतिथी म्हणून क्यूसीएफआयचे कार्यकारी संचालक दिनेश कुमार श्रीवास्तव , प्रेसिडेंट एमेरिटस सतीश काळोखे आणि संचालिका डॉ. रजनी इंदुलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. पुणे विभागीय परिषदेचे सदस्य संजीव शिंदे, डॉ. अजय फुलंबरकर, अनंत क्षीरसागर, भूपेश माल, धनंजय वाघोलीकर व परवीन तरफदार यांची ही कार्यक्रमाला उपस्थित होते. केस स्टडीचे परीक्षण अनंत क्षीरसागर, भूपेश माल, वेंकटेश पेड्डी आणि प्रशांत मुदलवडकर यांनी केले.तर घोषवाक्य व पोस्टरचे परीक्षण परवीन तरफदार व धनंजय वाघोलीकर यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन रहीम मिर्झाबेग, प्रशांत बोराटे आणि चंद्रशेखर रुमाले यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले.