Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय

डॉलर मजबूत, रुपया कमकुवत; ९३.८३ वर ऐतिहासिक घसरण

Rupee Depreciation |  सोमवार, २३ मार्च रोजी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९३.८३ या नव्या विक्रमी नीचांकी पातळीवर उघडला. रुपयातील सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे बाजारपेठेत चिंता वाढली असून, रुपयाला आधार देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कोणती पावले उचलते का, याकडे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

मागील व्यवहाराच्या दिवशी डॉलर ९३.७१ रुपयांवर बंद झाला होता. त्याआधी २० मार्च रोजी रुपयामध्ये जवळपास १०० पैशांची घसरण झाली होती. गेल्या चार वर्षांतील एकाच दिवसातील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. त्यामुळे रुपयावरचा दबाव अधिक वाढल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा       :              इराण युद्धासाठी डोनाल्ड ट्रम्प जबाबदार; CIA च्या माजी प्रमुखांची परखड टीका

दरम्यान, परदेशी (ऑफशोर) बाजारपेठांमध्ये रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आधीच ९४ च्या पातळीखाली घसरला होता. यामुळे भारतीय चलनावर सातत्याने दबाव असल्याचे संकेत मिळत होते. ‘नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्ड’ (NDF) बाजारातील दरांनीही सोमवारी सकाळी रुपया ९३.७८ ते ९३.८२ या श्रेणीत उघडण्याची शक्यता दर्शवली होती, जी जवळपास प्रत्यक्ष व्यवहारातही दिसून आली.

तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावरील अनिश्चितता, वाढलेली डॉलरची मागणी आणि परदेशी गुंतवणुकीतील घट यामुळे रुपयावर दबाव कायम आहे. आगामी काळात RBI च्या हस्तक्षेपावर आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर रुपयाची दिशा अवलंबून राहणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button