Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

जून महिन्यात तब्बल 12 दिवस बँका राहणार बंद, पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी

Bank holiday : जर तुम्हालाही जून महिन्यात बँकेशी संबंधित काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जून महिन्यामध्ये बँका तब्बल 12 दिवस बंद राहणार आहे. या महिन्यात बँकांना बारा दिवस सुट्टी आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय, स्थानिक उत्सव आणि साप्ताहिक सुट्ट्या यांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जाहीर केलेली जून महिन्यातील सुट्ट्यांची यादी पाहून तुम्ही तुमच्या बँकेतील कामांचं नियोजन करू शकता.

1 जून (रविवार) आठवडी रजा 6 जून (शुक्रवार) बकरी ईद – केरळमध्ये बँक बंद 7 जून (शनिवार) बकरी ईद – गुजरात, सिक्किम, अरुणाचल प्रदेश आणि केरळ सोडून इतर राज्यांमध्ये बँक बंद 8 जून (रविवार) आठवडी रजा 11 जून (बुधवार) संत कबीर जयंती (सिक्किम आणि मेघालय या दोन राज्यांमध्ये बँक बंद 14 जून (शनिवार) दुसरा शनिवार – बँकांना सुट्टी 15 जून (रविवार) आठवडी रजा 22 जून (रविवार) आठवडी रजा 27 जून (शुक्रवार) रथ यात्रा / कांग (ओडिशा आणि मणिपूरमध्ये बँक बंद 28 जून (शनिवार) चौथा शनिवार बँकांना सुट्टी 29 जून (रविवार) – आठवडी रजा 30 जून (सोमवार) -मिझोरम राज्यात बँकेला सुट्टी

हेही वाचा –  बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले पुन्हा अटकेत; दिल्लीतून घेतले ताब्यात

दरम्यान जून महिन्यात जरी बँकांना बारा सुट्ट्या असल्या तरी देखील बाराही दिवस सर्व राज्यातील बँका एकाचवेळी बंद राहणार नाहीयेत, तेथील स्थानिक उत्सवानुसार काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे, तर काही राज्यांमध्ये त्या दिवशी बँका सुरू राहणार आहेत. अपवाद फक्त दुसरा आणि तिसरा शनिवार तसेच दर दविवारी असलेल्या साप्ताहिक सुट्टीचा या दिवशी मात्र सर्व बँका या बंद असतात. त्यामुळे बँकांच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक पाहूनच आपण आपल्या बँकेतील कामाचं नियोजन केल्यास आपला वेळ व खर्च दोन्हीही वाचेल.

दरम्यान एक जूनपासून बँकेशी संबंधित काही नियमांमध्ये देखील बदल होणार आहेत. ज्यामध्ये एफडीचा व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम हा थेट ग्राहकांवर होऊ शकतो, तसेच एटीएमच्या वापरावरील चार्ज देखील वाढण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button