Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय

शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी; सेन्सेक्सने पुन्हा ओलांडला ५० हजारांचा टप्पा

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे शेअर बाजाराने जोरदार स्वागत केले आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. आज बाजार उघडताच सेन्सेक्स 1,000 अंकांनी वधारला असून निफ्टीनेही 300 अंकांची झेप घेतली आहे. काल अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सेन्सेक्स 2,300 अंकांनी वधारला होता.

दरम्यान, अर्थसंकल्पाच्या दिवशी 48,600 अंकांवर बंद झालेला सेन्सेक्स आज अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी 593 अंकांच्या उसळीसह 49,193 अंकांवर सुरू झाला. त्यानंतर सेन्सेक्समध्ये सतत तेजी बघायला मिळाली असून सेन्सेक्सने 50 हजारांचा आकडाही ओलांडला आहे. तर निफ्टीही अर्थसंकल्पाच्या दिवशी 14,281 अंकांवर बंद झाल्यानंतर आज 200 अंकांच्या तेजीसह 14,481 अंकांवर सुरू झाला आणि 14,700 अंकांपर्यंत पोहोचला. निफ्टीमध्येही दिवसाच्या सुरुवातीला तेजी बघायला मिळत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button