breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

‘या’ भारतीय कंपनीने पुढील एक वर्ष कर्मचारी किंवा पगार कपात करणार नसल्याचं केलं जाहीर

कोरोना व्हायरसमुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. कोरोनाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला असून विकास दर २.८ टक्क्यांवर येण्याची शक्यता असल्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. याचा फटका अनेक उद्योगांना बसणार आहे. काही उद्योगांमध्ये कर्मचारी आणि पगार कपात करण्याचे संकेत मिळत आहेत. ही परिस्थिती फक्त भारतात नाही तर जगातील अन्य देशांमध्ये देखील आहे. अशातच एका भारतीय कंपनीने पुढील एक वर्ष कर्मचारी कपात किंवा पगार कपात करणार नसल्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टाटा समूहाच्या मालिकीची असलेली टाटा स्टीलचे ग्लोबल सीईए टीव्ही नरेंद्रन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कर्मचारी आणि पगार कपात करणार नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. कंपनीचे लक्ष्य फक्त सध्याचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची उत्पादकता वाढवण्याची आणि त्याच विकास करण्याची आहे. परिस्थिती जशी सुधारेल तशी एक दिर्घकलीन योजना तयार केली जाणार असल्याचे नरेंद्रन यांनी सांगितले.

स्टील उत्पादनाचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करण्यात आला आहे. असे असेल तरी स्टील उत्पादनात कपात केली आहे. लॉकडाऊनचा कालावधी हा एक आव्हानात्मक असून टाटा स्टीलच्या कलिगानगर, जमशेदपूर आणि अंगुल येथील प्रकल्प सुरू ठेवण्यास परवागी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. फक्त स्टीलची निर्मिती होऊ शकत नाही. त्याच्या जोडीला अन्य गोष्टींची गरज असते. टाटा स्टीलच्या प्रकल्पातील उत्पादन ५० टक्के इतके सुरू आहे. कारण सर्व कर्मचाऱ्यांना कामावर बोलवणे धोक्याचे असल्याचे नरेंद्रन म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button