आज पुन्हा सोन्याच्या किमतीत वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Capture-54.jpg)
कोरोना व्हायरस, जागतिक बाजारपेठेतील वातावरणामुळे आज पुन्हा सोन्याच्या किमतीत वाढ झालेली पहायला मिळाली. या वर्षभरात आतापर्यंत सोन्याच्या किमती २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३९ हजार रुपये असलेले सोने ४९ हजारावर गेले आहे.
आज सकाळी बाजार सुरू होताच सोन्याच्या किमती ५१ अंकांच्या वाढीसह सुरू झाल्या. त्यानंतर किमतीत वाढचं दिसली. बाजार सुरू होताच सोन्याच्या किमती ४९ हजाराच्या पुढे गेल्या. सोन्याच्या किमतीत ७८ रुपयांची वाढ झाली असून ती ४९ हजार १०५ वर गेली तर चांदीच्या किमती १ हजार ११३ रुपयांनी वाढ होत तो आकडा किलोसाठी ५५ हजार ११८ रुपयांवर पोहोचला.
मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७ हजार ९४० वर तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८ हजार ९४० वर पोहोचला. कालपेक्षा मुंबईतील सोन्याच्या किमती आज कमी झाल्या आहेत.
सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७९७० रुपये, २४ कॅरेटचा भाव ५१३४० रुपये होता. तर चांदीचा भाव किलोला ५२९२० रुपये झाला होता. दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४७९२० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४९१२० रुपये, कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४८३६० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४९९४० रुपये इतका आहे. चेन्नईपाठोपाठ कोलकात्यात २४ कॅरेटचा भाव ५० हजारांवर गेला. तर चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७०५० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५१३४० रुपये झाला. त्यात ३२० रुपयांची घसरण झाली होती.
या वर्षाच्या सुरुवातीला ३९ हजार रुपये असलेले सोने आता ४९ हजाराच्यावर पोहोचले आहे. या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमती २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
जगभरात करोना व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असून त्यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत. येत्या काही दिवसात सोन्याच्या किमती विक्रमी स्तरावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.