पिंपरी / चिंचवड

दिलेल्या मुदतीत घराचा ताबा न दिल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

मुदतीत इमारतीचे काम पूर्ण करून सदनिकांचा ताबा नागरिकांना न देता फसवणूक केली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 मार्च 2019 ते 14 मार्च 2022 या कालावधीत चिखली येथे घडला.

सचिन प्रकाश ढवळे (रा. तळवडे), योगेश साहेबराव विनोदे (वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नरेश अशोक बिरादार (वय 32, रा. रावेत) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्या चिखली येथील कलश अपार्टमेंटच्या दुसया मजल्यावरील दोन सदनिका खरेदी केल्या. दोन्ही सदनिकांचा ताबा 31 डिसेंबर 2019 रोजी देणार असल्याचे आरोपींनी खरेदीखतामध्ये लिहून दिले. प्रत्येक सदनिका 21 लाख रुपये याप्रमाणे 42 लाख रुपयांपैकी दोन लाख रोख आणि 32 लाख रुपये बँकेच्या कर्ज खात्यातून दिले. मात्र आरोपींनी दिलेल्या मुदतीत फिर्यादी यांना सदनिकांचा ताबा दिला नाही. तसेच इमारतीचे काम अर्धवट ठेवले. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button