breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

Budget Session 2020 : ओबीसी जनगणनेला भाजपाचा पाठिंबा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

ओबीसी जनगणना करण्याच्या मागणीला भाजपाचा पाठिंबा आहे. ही धोरणात्मक बाब असल्याने यासाठी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन आपण सारे  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेऊ, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

महाराष्ट्राचा इतिहास विसरता कामा नये : जितेंद्र आव्‍हाड

ओबीसी समाजाच्या जनगणनेसंदर्भात राज्य शासनाकडून एक शिष्टमंडळ केंद्रसरकारकडे जाणार असले तरी महाराष्ट्राचा इतिहास विसरता कामा नये. सर्वात प्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची भूमिका मांडली. जगभरात आरक्षणाची संकल्पना आहे. अमेरीका, इंग्लड, हॉलंड, न्युझिलंड यांसारख्या राष्ट्रांमध्येही आरक्षण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यामागे ओबीसी हे कारण होते. आज ओबीसीमध्ये किती प्रवर्ग जाती आहेत? ओबीसी समाजातील कित्येकांच्या प्रमोशनमध्ये किती अडचणी येतात? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे इतर मागासवर्गीयांची जणगणना करण्यासंबधी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार ठाम आहे. लोकसंख्येची गणना करताना राज्यातील विखुरलेला इतर मागासवर्गीय वर्ग प्रत्यक्षात किती टक्के आहे, हेही महाराष्ट्राला समजलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button