breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Apple चे CEO टिम कुक यांची मोठी घोषणा,भारतात अ‍ॅपलचे ऑनलाइन स्टोअर लवकरच सुरु…

अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या शेअर होल्डर्सच्या बैठकीत मोठी घोषणा केली आहे. लवकरच अपलकडून भारतात ऑनलाइन स्टोअर सुरू करण्यात येतील. कुक म्हणाले की, यासाठी सरकारने आम्हाला मंजुरी द्यावी. भारतात त्यांचा उद्योग इतर कोणाच्या हातात सोपवायचा नाही.

भारत सरकारकडून अद्याप अ‍ॅपलला परवानगी मिळालेली नाही. आम्ही भारत सरकारशी चर्चा करत आहे. आम्हाला आशा आहे की लवकरच मंजुरी मिळेल असंही टिम कुक म्हणाले.

अ‍ॅपलने भारतात ऑनलाइन स्टोअर उघडलं तर त्यांच्या नफ्यात वाढ होऊ शकते. काउंटर पॉइंट रिसर्चच्या हवाल्याने एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, भारतात ऑनलाइन स्टोअर सुरू केल्यानंतर अ‍ॅपल फक्त आयफोनपुरतं मर्यादित राहणार नाही. भारतात युजर्सच्या दृष्टीने बघायचं म्हटलं तर ऑनलाइन उलाढाल मोठी आहे. अ‍ॅपलचं ऑनलाइन स्टोअर सुरु झाल्यानतंर ग्राहकांना कंपनीची सर्व प्रोडक्ट्स एकाच ठिकाणी मिळतील. यामुळे कंपनीला त्यांचा विस्तार करणं शक्य होईल.

सध्या अ‍ॅपल त्यांचे प्रोडक्ट अ‍ॅमेझॉन आणि फ्लिककार्टच्या माध्यमातून विकते. यामुळे कंपनीला त्यांच्या उत्पन्नातील काही भाग त्या कंपन्यांना द्यावा लागतो. जर अ‍ॅपलने भारतात ऑनलाइन स्टोअर सुरु केलं तर त्यांना इतरांना पैसे द्यावे लागणार नाहीत. तसेच ग्राहकांना एकाच जागी सर्व सेवा मिळतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button