breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

अक्षय कुमरावर थुंका, १० लाख रूपये मिळवा, नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची सर्वत्र चर्चा होत आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने १० कोटी तर दुसऱ्या दिवशी १५ कोटी रूपयांची कमाई केली आहे. मात्र या सिनेमातील काही दृश्यांवरून वाद सुरू झाला आहे. शाळांमधील लैंगिक शिक्षण या विषयावर आधारित या चित्रपटाने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं दिसत आहे. राष्ट्रीय हिंदू परिषदेने या चित्रपटात भगवान शिव यांच्या दूताची भूमिका करणाऱ्या अक्षय कुमारवर थुंकणाऱ्याला किंवा त्याला थप्पड लगावणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू संघटनेचे अध्यक्ष गोविंद पाराशर यांनी या बक्षिसाची घोषणा केली आहे. अक्षय कुमारने चित्रपटात भगवान शिव यांच्या दूताची भूमिका केली आहे. यामध्ये तो बूट घालून दिसतो, कचोरी खरेदी करतो आणि घाण पाण्यात आंघोळ करताना दिसतो. पाराशर यांच्या मते, हा चित्रपट देवाची प्रतिमा मलिन करतो. सेन्सॉर बोर्ड आणि केंद्र सरकारने या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

हेही वाचा – महाराष्ट्रासमोर हे काय चाललंय? काका-पुतण्याच्या भेटीवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

दरम्यान, हिंदू धर्माच्या उदारतेमुळे बॉलीवूड पुन्हा पुन्हा असा उद्धटपणा करत आहे. ते हिंदू धर्म सोडून इतर कोणत्याही धर्मावर भाष्य करायला घाबरतात. याआधीही मोठ्या पडद्यावर हिंदू देव-देवतांचा अपमान झाला आहे. त्यामुळे हिंदूंच्या श्रद्धेशी खेळू नका, असा इशारा दुर्गा वाहिनीच्या संस्थापक वृंदावनच्या साध्वी रिथंबरा यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button