breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Budget 2020 : आधी मुलींच्या लग्नाचे वय वाढवले, आता आई होण्याचे वयही ठरणार : निर्मला सीतारमण

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) लोकसभेत आर्थिक वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प (वहीखातं) सादर केला आहे. यामध्ये निर्मला सीतारमण यांनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. आधी मुलींच्या लग्नाचे वय वाढवले, आता मुलींच्या आई होण्याच्या वयोमर्यादेवरही विचार करणार असल्याचे अर्थमंत्री सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे.

निर्मला सीतारमण म्हणाल्या, “आधी मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्यात आलं होतं. आता आमचं सरकार मुलींच्या आई होण्याच्या वयावरही विचार करत आहे. यासाठी एका ‘टास्क फोर्स’ची स्थापना केली जाईल. ही टास्क फोर्स 6 महिन्यांमध्ये या विषयावरील आपला अहवाल सादर करेल.”

महिलांसाठी

  • महिलांशी निगडित विशेष उपक्रमांसाठी 28600 कोटींची तरतूद
  • बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला प्रोत्साहन देणार
  • 10 कोटी कुटुंबाला पोषण मूल्यांची माहिती देणार
  • 6 लाखपेक्षा जास्त अंगणवाडीसेविकांना स्मार्टफोन देणार
  • महिलांच्या लग्नाचं वय वाढवलं होतं, आता आमचं सरकार मुलींना माता बनण्याचं किमान वयोमर्यादेवर विचार करेल. एक टास्क फोर्स तयार करुन 6 महिन्यात त्याबाबतचा अहवाल सोपवेल.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button