breaking-newsराष्ट्रिय

BSNL चिनी उपकरणांचा वापर बंद करण्याची चिन्हं

नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात  संघर्षानंतर आता देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. तसेच, सरकारने दूरसंचार कंपनी बीएसएनलला चिनी उपकरणांचा वापर कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

  • दूरसंचार मंत्रालयाचे BSNL ला आदेश

दूरसंचार मंत्रालयाने BSNL ला चिनी कंपन्यांची उपयुक्तता कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. या व्यतिरिक्त, दूरसंचार मंत्रालयाने खासगी कंपन्यांना नव्याने विचार करुन याबाबत ठाम निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

  • मंत्रालयाचे निर्देश काय?

– 4 जी सुविधेच्या अपग्रेडेशनसाठी कोणत्याही चिनी कंपन्यांनी बनविलेल्या उपकरणांचा वापर करु नये

– संपूर्ण निविदा नव्या पद्धतीने पुन्हा जारी करा

– सर्व खाजगी सेवा चालकांना चिनी उपकरणांवर अवलंबून असलेली कामं लवकरात लवकर कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Boycott Chinese Equipment

  • इंटरनेट कंपन्यांमध्ये चिनी कंपन्याची मोठी गुंतवणूक

भारताच्या जेवढ्याही मोठ्या इंटरनेट कंपन्या आहेत, त्यामध्ये चिनी कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात गुतवणूक केली आहे. आकड्यांनुसार, दूरसंचार उपकरणांचा बाजार 12 हजार कोटींचा आहे, यामध्ये चिनी उपकरणांचा शेअर जवळपास 25 टक्के आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button