Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीराष्ट्रिय

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक

NIA Arrests Two People : पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. या प्राणघातक हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल तपास संस्थेने दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची ओळख पटली आहे, ती म्हणजे परवेझ अहमद जोथर, बटकोट आणि बशीर अहमद जोथर, हिल पार्क. हे दोघेही पहलगामचे रहिवासी आहेत.

एजन्सीच्या (NIA) म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान दोघांनीही तिन्ही हल्लेखोरांची ओळख उघड केली. ज्यामुळे ते बंदी घातलेल्या दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) शी संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी झाली. एनआयएच्या तपासानुसार, परवेझ आणि बशीर यांनी हल्ल्यापूर्वी हिल पार्कमधील एका तात्पुरत्या ढोक (झोपडी) मध्ये दहशतवाद्यांना जाणूनबुजून आश्रय, अन्न आणि लॉजिस्टिकल सपोर्ट पुरवला होता.

हेही वाचा –“हिंदीच्या अट्टाहासापायी विद्यार्थ्यांचे नुकसान का करताय?”; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला सवाल

येथे राहिल्यानंतर, दहशतवाद्यांनी पर्यटन स्थळाची रेकी केली. नंतर लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारून आणि त्यांच्यावर गोळीबार करून हल्ला केला. ज्यामुळे 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. एनआयएच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 च्या कलम 19 अंतर्गत दोन्ही व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दोघांनाही आरसी-02/2025/एनआयए/जेएमयू प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या एनआयए पुढील तपास करत आहे.

22 एप्रिल रोजी शस्त्रांनी सज्ज दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हल्ला केला. या दरम्यान दहशतवाद्यांनी हिंदू पुरुषांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर गोळ्या घातल्या. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. भारताच्या या कारवाईनंतर भारत-पाक सीमेवर तणाव वाढला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button