Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली; जेलमध्येच वैद्यकीय पथकाकडून तपासणी

Share On

Walmik Karad :  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या बीडच्या तुरुंगात आहे. मात्र वाल्मीक कराडची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री वैद्यकीय पथकाकडून त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्याला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास जाणवत होता. पण त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याचं वैद्यकीय पथकाने सांगितलं. जेलमध्ये असताना वाल्मिक कराडने अनेकदा प्रकृती ठीक नसल्याचे कारण दिले आहे. यातच शनिवारी पुन्हा एकदा कारागृहात वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर आले होते.

हेही वाचा –  पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक

याशिवाय वाल्मिक कराड याला तुरुंगात व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी केला होता. दरम्यान, बीडमधील विशेष मोक्का न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ३ जूनला झालेल्या सुनावणीवेळी वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावर युक्तिवाद झाला. पण न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला.

दरम्यान, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय म्हणून वाल्मिक कराड ओळखले जातात. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुंडे यांच्यावर मंत्रि‍पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव होता. त्यानंतर त्यांनी प्रकृतीचे कारण देत मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button