breaking-newsTOP News

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जयंतीदिनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना आदरांजली!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीदिनी (दि.१५) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी त्यांना जयंतीदिनी आदरांजली वाहावी लागतेय, ही वेदनादायी बाब आहे, अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझे मित्र, स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळे गुरव (चिंचवड) येथील निवासस्थानी काल रात्री गेलो, तेव्हा या वेदना जरूर झाल्या की, आज त्यांच्या वाढदिवसाऐवजी जयंतीदिनी त्यांना अभिवादन करावे लागले. लक्ष्मणभाऊंची गळाभेट घेण्याऐवजी त्यांच्या छायाचित्राला पुष्पांजली अर्पण करावी लागली. यावेळी अश्विनीताई, शंकरभाऊ आणि अन्य जगताप कुटुंबीय, मित्र परिवाराशी हितगुज करता आले, असेही फडणवीस म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात तब्बल ३५ वर्षे आपला दबदबा ठेवलेले दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे दि. ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यानंतर शहरात पोटनिवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्याकडे भाजपा+बाळासाहेबांची शिवसेना महायुतीची उमेदवारी आहे. अवघ्या महिन्याभरात लागलेल्या या पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबीयांप्रति जनमानसामध्ये सहानुभूतीची लाट आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button