Breaking-newsआंतरराष्ट्रीय
#CoronoVirus:कोरोनाची सुरुवात ज्या शहरातून झाली, त्या शहरात आता एकही कोरोनाचा रुग्ण नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/IMG_20200427_101127.jpg)
वुहान. चीनमधील ज्या वुहान शहरातून कोरोना व्हायरस(कोव्हिड-19)ची सुरुवात झाली होती, त्या शहरात आता एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही. आता वुहानमधील रुग्णालयात एकही कोरोनाचा रुग्ण भरती नाही. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, हुबेई प्रांताटी राजधानी वुहानमधील रुग्णालयात एकही रुग्ण नाही. शहरात मागील 76 दिवसांपासून लॉकडाउन होता.
चीनच्या नॅशनल हेल्थ कमीशनचे प्रवक्ते मि फेंग यांनी बीजिंगमध्ये प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये म्हणाले की, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कठीर परिश्रमामुले हे लक्ष मिळवले आहे. वृत्तसंस्था शिन्हुआच्या रिपोर्टनुसार, वुहानमध्ये दाखल असलेल्या शेवटचा कोरोना रुग्ण शुक्रवारी ठीक झाला.