#Coronavirus:मास्क न घातल्यास ‘या’ देशात होतेय कठोर शिक्षा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/CoronaVirus-Mask.jpg)
नवी दिल्ली : कोरोना व्हायरस जगभरातील 190 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी फेसमास्क सर्वात गरजचं आहे. मास्क घालणं सर्वच देशांमध्ये आवश्यक आहे. मास्क न घातल्यास अनेक देशांमध्ये शिक्षेचीही तरतूद आहे. पण मास्क न घातल्यास शिक्षा देण्याच्या बाबतीत अरब देश सर्वांच्याच पुढे आहेत. या देशांमध्ये फेस मास्क न घालणाऱ्यांवर सरकारकडून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येत आहे.
कुवेत आणि कतारमध्ये जर कोणत्याही व्यक्तीने मास्क घातलं नाही, तर अशा लोकांना तुरुंगवासाची शिक्षा तसंच त्यांच्याकडून दंडही आकारण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुवेतमधील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मास्क न घातल्यामुळे दोषी ठरलेल्या व्यक्तीला तीन महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.
तर कतारमध्ये मास्क न घातल्यास तब्बल तीन वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.इतकंच नाही तर या देशात मास्क न घातल्यास मोठा दंडदेखील आकारण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुवेतमध्ये जास्तीत-जास्त दंड 5 हजार दिनार (16,200 डॉलर) इतका आहे. तर कतारमध्ये हा दंड तब्बल तीन पटींनी अधिक आहे. म्हणजेच 200,000 रियाल (55,000 डॉलर) इतका आहे.