6 मुस्लिमबहुल देशवासीयांच्या प्रवेशबंदीचा ट्रम्प आदेश योग्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/usa-1-1.jpg)
वॉशिंग़्टन (अमेरिका) – निर्वासितांना आणि 6 मुस्लिमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करणारा ट्रम्प यांचा आदेश योग्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 5 विरुद्ध 4 अशा मताने ट्रम्प यांचा आदेश वैध ठरवला आहे. आणि तो अंशत: लागू करण्याला संमती दिली आहे.
स्थलांतरितांवर नियंत्रण ठेवण्याचे पुरेसे अधिकार अध्यक्षांना आहेत असे मुख्य न्यायाधीश जॉन डी रॉबर्टस यांनी निकालात म्हटले आहे.
डोनॉल्ड ट्रम्प यांचा आदेश मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप करणारी आणि त्याला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मात्र सर्वसाधारण स्थलांतरित आणि खास करून मुस्लिमांबाबत ट्रम्प यांच्या प्रक्षोभक विधानांचे त्यांनी समर्थन केले नाही. धोरणाच्या गांभीर्याबद्दल आम्ही कोणतेही मत व्यक्त करत नाही, असे मुख्य न्यायाधीश जॉन डी रॉबर्टस यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत अध्यक्षांनी घेतलेले निर्णय न्यायालयाने योग्य मानले आहेत. हा अमेरिकेच्या नागरिकांचा आणि संविधानाचा विजय आहे, असे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी न्यायालयाच्या निकालानंतर म्हटले आहे. निकालानंतर त्यांनी Wow ! ट्विट केले आहे.
ईराण, लीबिया, सोमालिया, सीरिया, येमेन अशा सहा मुस्लिमबहुल देशांवर लागू असलेल्या ट्रम्प यांच्या प्रवेशबंदीच्या निर्णयावर जगभरातून जोरदार टीका झाली होती.