Breaking-newsराष्ट्रिय

‘स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी RSS चे लोक ब्रिटिशांची चमचेगिरी करत होते’

आपला देश पारतंत्र्यात होता, सगळ्या देशात स्वातंत्र्य लढा उभा राहिला होता. त्यावेळी आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक इंग्रजांची चमचेगिरी करण्यात मग्न होते असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे. पंजाबमधल्या भटिंडा या ठिकाणी त्या बोलत होत्या. पंजाब जेव्हा स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाला होता त्यावेळी RSS अर्थात संघाचे लोक इंग्रजांची चमचेगिरी करत होते अशी घणाघाती टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

ANI

@ANI

Priyanka Gandhi Vadra in Bathinda, Punjab: When the entire Punjab was fighting for country’s independence, RSS people were doing ‘chamchagiri’ (flattery) of Britishers, they never fought in the independence movement.

464 people are talking about this

लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा १९ तारखेला होणार आहे. २३ मे रोजी निकाल लागणार आहे. या निकालादरम्यान काय होणार त्याकडे देशाचं लक्ष लागलेलं असणार आहे. मात्र त्याआधी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच रंगल्या आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर निशाणा साधत आहेत. विरोधक म्हणजे महामिलावटी लोक आहेत अशी टीका मोदी करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेते मोदींवर निशाणा साधत आहेत.

‘चौकीदार चोर है’ या घोषणा काँग्रेसच्या सभेत दिल्या जात आहेत. तर प्रियंका गांधी यांनी मोदींची तुलना दुर्योधनासोबत केली. २३ मे रोजी दुर्योधन कोण आणि अर्जुन कोण हे स्पष्ट होईल असं प्रत्युत्तर अमित शाह यांनी दिलं आहे. एकमेकांवरचे हे आरोप प्रत्यारोप थांबत नसतानाच आज पुन्हा एकदा प्रियंका गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. संघाचे लोक स्वातंत्र्य लढा सुरू असताना इंग्रजांची चमचेगिरी करत होते अशी टीका त्यांनी भटिंडामधल्या सभेत केली. आता या टीकेला भाजपा किंवा आरएसएसचे लोक काही उत्तर देणार का हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button