Breaking-news
सिद्धरामैय्या चामुंडेश्वरीत पिछाडीवर

बंगळूरू : कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामैय्या यांना हादरा बसला आहे. निवडणुकीच्या पहिल्या तासाभरातील कलानुसार सिद्धरामैय्या चामुंडेश्वरीत पिछाडीवर असून बदामी या मतदारसंघातून ते आघाडीवर आहेत.
भाजपला शह देण्यासाठी सिद्धरामैय्या या भागातून निवडणूक लढवीत आहेत. भाजप नेते व बेल्लारी ग्रामीणचे खासदार श्रीरामलू हे बदामीत सिद्धरामैय्या यांच्याविरोधात रिंगणात आहेत. या मतदार संघात सुरुवातीला सिद्धरामैय्या पिछाडीवर होते. पण तासाभरानंतर त्यांनी आघाडी घेतली.





