Breaking-newsराष्ट्रिय

शबरीमलाची परंपरा मोडणाऱ्या महिलेला सासूकडून मारहाण, रूग्णालयात दाखल

शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या दोन महिलापैकी कनकदुर्गा या महिलेला तिच्या सासूने मारहाण केली आहे. दोन जानेवारीच्या पहाटे बिंदू आणि कनकदुर्गा या पन्नाशीच्या आतल्या दोन महिलांनी शबरीमलामध्ये प्रवेश करुन भगवान अय्याप्पांचे दर्शन घेतले. त्यावरुन केरळमध्ये मोठा वाद आणि हिंसाचार झाला.

कनकदुर्गा मंगळवारी सकाळी पेरींतलमन्ना येथील तिच्या घरी परतली. त्यावेळी सासू आणि तिच्यामध्ये शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यावरुन वाद झाला असे कुटुंबाच्या जवळ असलेल्या सूत्रांनी सांगितले.

सासूने कनकदुर्गाच्या डोक्यावर प्रहार केला. कनकदुर्गा या हल्ल्यामध्ये जखमी झाली. तिला पेरींतलमन्ना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button