Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीराष्ट्रिय
युजीसी-नेट परीक्षा २ ते १७ मे रोजी! शिक्षणमंत्री पोखरियाल यांची घोषणा
नवी दिल्ली-प्राध्यापक भरतीच्या पात्रतेसाठीची यूजीसी नेट २०२१ ही परीक्षा २ ते १७ मे २०२१ दरम्यान घेण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटमध्ये केली आहे.यूजीसी नेटची परीक्षा २, ३, ४, ५, ६, ७, १०, ११, १२, १४ आणि १७ मे २०२१ पर्यंत घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षार्थींना आज २ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज करता येतील. या अर्जांची शेवटची तारीख २ मार्च आहे. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ सहा अशी दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. एकंदर ३ तासांची ही परीक्षा आहे. यासाठी परीक्षा शुल्क ३ मार्चपर्यंत भरता येईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.





