युगांडामध्ये ट्रक – ट्रॅक्टरच्या अपघातात 22 ठार

काम्पाला, (युगांडा) – युगांडाच्या उत्तरेकडील भागात बस, ट्रक आणि ट्रॅक्टरच्या धडकेमध्ये किमान 22 जण ठार झाले. युगांडाची राजधानी कम्पालापासून 220 किलोमीटरवर किरयानडोंगो इथे हा अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रॅक्टरचे दिवे रात्रीच्यावेळी बंद होते. त्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहोचवण्याचे काम अविरतपणे सुरू आहे, असे इमिलान कयिमा या युगांडाच्या पोलिस प्रवक्त्या महिलेने सांगितले. या अपघातात तिन्ही वाहनांचे चालम मृत्यूमुखी पडले आहेत.
दिवे बंद असलेल्या ट्रॅक्टरवर प्रथम बस धडकली आणि नंतर बीअरची वाहतुक करणाऱ्या ट्रकवर ही बस धडकली. युगांडातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असल्याने रस्ते अपघातांचे प्रमाण तेथे खूप जास्त आहे. 2015 ते 2017 दरम्यान तेथे 9,500 पेक्षा अधिक लोक रस्ते अपघातात मरण पावले आहेत.





