Breaking-newsराष्ट्रिय
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या बैठकीला 90 आमदार पोहोचले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/ghelot.jpg)
जयपूर : मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू आहे. सभेला जवळपास 90 आमदार पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री सचिन पायलट अद्याप बैठकीला पोहोचलेले नाहीत. सभेला न पोहोचल्यास सचिन पायलट यांना काँग्रेसमधून काढले जाऊ शकते.
महेश जोशी म्हणाले की, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी दिलेला व्हीप चुकीचा असल्याचं म्हणणारेच चुकीचे आहेत. व्हिपला आव्हान देणारे प्रकरण हे कायदेशीर कार्यक्षेत्राखाली येते. पक्ष नेतृत्वाच्या निर्देशानुसार बैठकीसाठी व्हिप जारी करण्यात आला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना येण्यास उशीर होत असल्याने बैठक उशीरा सुरु होत आहे. वेणुगोपाल चार्टर विमानाने त्रिवेंद्रमहून जयपूरला येत आहेत. रामलाल मीणा आणि गोपाळ मीणा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.