Breaking-newsराष्ट्रिय
महिला हॉकी संघाचे पंतप्रधानांकडून कौतुक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/hockey-gold-cost-615x420.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जकार्ता येथील आशियाई स्पर्धांमध्ये रौप्य पदक विजेत्या महिला हॉकी संघाची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. याबाबत नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे महिला हॉकी संघासोबत त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच पंतप्रधानांनी “आपल्या देशाच्या नारी शक्तीने आणखीन एकदा अभिमानास्पद कामगिरी केली आहे. महिला हॉकी संघाचे खेळासंबंधीचे आत्मसमर्पण कौतुकास्पद आहे.” असा संदेश देखील दिला आहे.