breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

मदरशांचा नकार गोवर-रुबेला लसीकरणाला

उत्तर प्रदेशमधील शेकडो मदरशांनी आपल्या विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेलाची लस देण्यास नकार दिला आहे. या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाकडून देशभरात व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. नऊ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या बालकांना ही लस दयावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले होते. मात्र व्हॉटसअॅपवर या लसीबाबत आलेल्या एका मेसेजमुळे मदरशांनी लस देण्यास नकार दिला आहे. एकट्या मेरठमध्ये २७२ मदरसे आहेत. यातील ७० मदरशांनी आरोग्य विभागाला मदरशांमध्ये प्रवेश देण्यास नकार दर्शवला आहे. याबाबत माहिती देताना जिल्हा लसीकरण अधिकारी विश्वास चौधरी म्हणाले, या भागात व्हॉटसअॅपद्वारे एक मेसेज फीरत आहे. मुस्लिम मुलांना नपुसंक बनवण्यासाठी सरकार या लसीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे असे या व्हॉटसअॅप मेसेजमध्ये म्हटले आहे.

काही मदरशांनी तर लसीकरणाच्या दिवशी मुलांना मदरशांमध्ये येऊ नका असे सांगितले आहे. याबाबत सहारनपूरचे चीफ मेडिकल ऑफीसर डॉ. बी.एस.सोढी म्हणाले, लोकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये म्हणून आणि लसीकरणाशी संबंधित त्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर व्हावेत म्हणून जागरुकता अभियान राबवत आहोत. याआधीही महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये असाच प्रकार घ़डला होता. यामध्ये सोलापूरमधील ४१ शाळांनी ही लस आपण आपल्या शाळेतील मुलांना देणार नसल्याचे सांगितले होते. आपल्या शाळेतील मुलांच्या आरोग्याला धोका उद्भवू नये या भितीने शाळांनी लस घेण्यास नकार दिला होता. ही लस देणे धोकादायक असल्याच्या व्हिडियो क्लीप समाजमाध्यमांवर फीरत होत्या. त्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्याही खोट्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button