breaking-newsराष्ट्रिय
पोलिसांना चौकशीदरम्यान स्थावर मालमत्ता जप्तीचा अधिकार नाही – सुप्रीम कोर्ट
फौजदारी गुन्ह्यांच्या चौकशीदरम्यान आरोपीच्या स्थावर मालमत्ता जप्तीचा अधिकार पोलिसांना नाही, असा महत्वपूर्ण निकाल मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दिला. न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना या दोन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला.
खंडपीठाने म्हटले की, को़ड ऑफ क्रिमिनल प्रोसेजरच्या सेक्शन १०२ नुसार पोलिसांना चौकशीदरम्यान आरोपीची स्थावर मालमत्ता जप्तीचा अधिकार नाही. न्या. खन्ना यांनी खंडपीठाचा हा निर्णय वाचून दाखवला तसेच हा एकमताचा निर्णय असल्याचे म्हटले. यावेळी न्या. गुप्ता यांनी याची काही अतिरिक्त कारणे देखील सांगितली.