Breaking-newsराष्ट्रिय
पेट्रोलची दरवाढ आजही कायम
![Petrol and diesel prices rose for the sixth day in a row](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Petrol_2017071809.jpg)
नवी दिल्ली – काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरात एकतर्फी सुरू असलेली दरवाढ आजही कायम आहे. आज पेट्रोलचा दर लिटरमागे ११ पैशांनी वाढला आहे. परंतु डिझेलचे दर मात्र २४ दिवसांनंतरही स्थिर असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत असली तरी भारतात मात्र पेट्रोलची दरवाढ सुरूच आहे. त्यात आज दिल्लीत ११ पैसे लिटर एवढे पेट्रोल महागल्यामुळे त्याचा दर ८१ रुपये ७३ पैसे झाला असून डिझेलचा दर मात्र ७३ रुपये ५६ पैसे लिटर आहे. मुंबईतही पेट्रोलचा दर ११ पैशांनी वाढल्यामुळे पेट्रोल ८८ रुपये ३९ पैसे झाले असून डिझेल ८० रुपये ११ पैसे लिटर आहे. कोलकाता येथे पेट्रोल ११ पैसे लिटर महागले आहे. चेन्नईत ९ पैसे लिटर आणि बेंगळुरूत १२ पैसे लिटर एवढे पेट्रोल महागले आहे.