Breaking-newsआंतरराष्ट्रीय

पाकिस्तानच्या तुरुंगात 471 भारतीय कैदी

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या तुरुंगातल्या 471 भारतीय कैद्यांची यादी आज भारतीय उच्चायुक्‍तालयाच्या स्वाधीन करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान दरम्यान 21 मे 2008 रोजी झालेल्या “कॉन्स्यूलर ऍक्‍सेस ऍग्रीमेंट’ नुसार या कैद्यांची यादी देण्यात आल्याचे पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. या भारतीय कैद्यांमध्ये 418 मच्छिमार आणि पाकिस्तानच्या सागरी हद्दीमध्ये अवैधरित्या प्रवेश करणाऱ्या 53 अन्य कैद्यांचा समावेश आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील करारानुसार दोन्ही देशांनी आपापल्या तुरुंगात असलेल्या दुसऱ्या देशाच्या नागरिकांच्या याद्यांची आदलाबदल वर्षातून करणे आवश्‍यक आहे. दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी या याद्यांची आदलाबदल करण्यात येते. भारताच्या तुरुंगात असलेल्या पाकिस्तानी कैद्यांची यादीही लवकरच पाकिस्तान उच्चायुक्‍तांना सोपवण्यात येणे अपेक्षित आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button