Breaking-newsराष्ट्रिय
पत्रकार विनोद दुवांवरील खटल्याची अंतिम सुनावणी १० ऑगस्टला

नवी दिल्ली – पत्रकार विनोद दुवा यांच्यावरील देशद्रोहाच्या खटल्याची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात १० ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या एका यूट्यूब व्हिडिओबाबत शिमला पोलिसांनी दुवांविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल केला होता.
याप्रकरणी आज न्यायमूर्ती उदय ललित यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने अंतिम सुनावणी १० ऑगस्ट रोजी घेण्याचे ठरवले. यापूर्वी त्यांना अटकेपासून असलेले संरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने १५ जुलैपर्यंत वाढवले होते. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देणे हे दुवांना बंधनकारक नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.





