Breaking-newsराष्ट्रिय
देशात २४ तासांत तब्बल ७८ हजार ५१२ नवे कोरोनाबाधित रुग्ण
![# Covid-19: Worrying! Even after vaccination, many suffer from coronary heart disease](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-2.jpg)
नवी दिल्ली – मागील काही आठवड्यांपासून देशातील रुग्णसंख्यावाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. काही दिवसांपासून दररोज ७० हजार ते ७५ हजारांच्या सरासरीने नवे रुग्ण आढळून येत आहेत. मागील २४ तासांत देशात ७८ हजार ५१२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ९७१ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. यासह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३६ लाख २१ हजार २४६ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ६४ हजार ४६९ इतका झाला आहे.
सध्या देशात ७ लाख ८१ हजार ९७५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २७ लाख ७४ हजार ८०२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, जगभरात कोरोनाचा सार्वधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्याखालोखाल ब्राझील आणि भारताची रुग्ण संख्या सर्वाधिक आहे. देशात मागील चार दिवसात सलग १ हजारांहून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.