Breaking-newsराष्ट्रिय
दिल्लीत JNUचे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये तुफान राडा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/jnu-students.jpg)
दिल्ली:- कायम चर्चेत राहणाऱ्या दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात JNU आज तुफान राडा झाला. त्यामुळे राजधानीतलं वातावरण चांगलंच तापलंय. JNU प्रशासनाने लादलेले नवे नियम आणि फी वाढीमुळे विद्यार्थी संघटना भडकल्या आहेत. नव्या नियमांमध्ये मुलींना रात्री मुलांच्या हॉस्टेलवर जाता येणार नाही.त्याविरोधात विद्यार्थ्यांनी JNU कॅम्पसमध्ये निदर्शनांचं आयोजन केलं होतं.विद्यार्थ्यांचा रेटा वाढल्याने पोलीस आणि विद्यार्थ्यी आमने-सामने आले आणि धुमश्चक्री झाली त्यामुळे वातावरण चांगलचं तापलं.विद्यार्थी बॅरेकेट्सला धडका देत असल्याने पोलिसांनी लाठी हल्लाही केला.