Breaking-newsराष्ट्रिय
दिल्लीत संसद इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग
![All-party meeting on July 18 before the session of Parliament](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/sansad-.jpg)
नवी दिल्ली – संसदेच्या अॅनेक्सी इमारतीत आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीच्या माहितीनंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अग्निशमन दलाने जोरदार प्रयत्न करत की आग आटोक्यात आणली. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
संसदेतील सहाव्या मजल्यावर ही आग लागली होती. इलेक्ट्रिक बोर्डजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. आग संसदेच्या इतर भागात पसरण्याआधीच विझवल्याने मोठा अनर्थ टळला.दिल्ली फायर सर्विसचे अधिकारी या आग प्रकरणाचा तपास करत आहेत.