Breaking-newsराष्ट्रिय

नवी दिल्लीत गणपती आणि मोहरमच्या मिरवणुकांवर कोरोनामुळे बंदी

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत यावेळी दिल्लीत मोहरमच्या मिरवणुका आणि गणेश आगमन मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने यासंदर्भात आदेश जारी केलेते आहेत. तसेच गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासही मनाई केली गेली आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी आपल्या घरीच सण आणि उत्सव साजरे करावेत, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केलं आहे. याव्यतिरिक्त, सर्व संबंधित विभागांना केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्सव किंवा कार्यक्रमांमध्ये गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता यावा यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हाधिकाऱ्यांना आगामी उत्सवांच्या उत्सव आणि कार्यक्रमांच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button