जॉन्सन्स बेबी पावडरच्या नव्या चाचण्यांमध्ये अॅस्बेस्टॉस नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Johnson-and-Johnson.jpg)
जॉन्सन अँड जॉन्सन कन्झ्युमर कंपनीने यू. एस. फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) अगोदर चाचणी केलेल्या जॉन्सन्स बेबी पावडरच्या त्याच बाटलीच्या 15 नव्या चाचण्यांमध्ये अॅस्बेस्टॉस आढळले नसल्याचे आज जाहीर केले आहे. कंपनीने ऑक्टोबर 18 रोजी स्वेच्छेने परत बोलावलेल्या, जॉन्सन्स बेबी पॉवडरच्या एकाच लॉटमधील (लॉट #22318RB) नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील 48 अतिरिक्त नव्या चाचण्यांमधूनही उत्पादनामध्ये अॅस्बेस्टॉस नसल्याचे अधोरेखित झाले आहे. कंपनी सध्या राबवत असलेल्या चाचण्यांचा व तपासाचा भाग म्हणून, दोन थर्ड-पार्टी लॅबोरेटरीजनी या चाचण्या केल्या. “जॉन्सन्स बेबी पावडरमध्ये अॅस्बेस्टॉस नसल्याचे कठोर व थर्ड-पार्टी चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे. आम्ही उत्पादनांची सुरक्षितता जपली आहे,” कंपनीने नमूद केले आहे.
- प्रयोगशाळा दूषित असल्याने चाचणीमध्ये सकारात्मक निष्कर्ष मिळाल्याची शक्यता
स्वेच्छेने उत्पादने परत मागवल्यावर, कंपनीने ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी (टीईएम), पॉवडर एक्स-रे डिफ्रॅक्शन (एक्सआरडी) व पोलराइज्ड लाइट मायक्रोस्कोपी (पीएलएम) टेस्टिंग यांचा वापर करून, मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याचे कंत्राट दोन थर्ड-पार्टी लॅबोरेटरीजना दिले होते.
स्टँडर्ड प्रिपरेशन रूमचा वापर करण्याच्या नियमाबरोबरच, एका प्रयोगशाळेने हा संकेत मोडत ऑक्झिलरी रूमचा वापर केला. त्या ऑक्झिलरी रूममध्ये, पाच नमुने तयार करण्यात आले. सुरुवातीला तीन नमुन्यांमध्ये अॅस्बेस्टॉसची चाचणी सकारात्मक आली. या निष्कर्षाबाबत, प्रयोगशाळेने तपास हाती घेतला आणि त्यामध्ये ऑक्झिलरी रूममधील नमुना तयार करणारा पोर्टेबल एअर कंडिशनर अॅस्बेस्टॉस बाधित होता, असे आढळले. स्टँडर्ड रूममध्ये तयार केलेल्या कोणत्याही नमुन्यामध्ये कोणतेही अॅस्बेस्टॉस सापडले नाही, असे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे संबंधित प्रयोगशाळा दूषित असण्याची शक्यता कंपनीनं व्यक्त केली आहे.