Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
‘नॅशनल अर्बन लिडरशीप प्रोग्राम’मध्ये देशभरातून पिंपरी-चिंचवडची निवड

– देशात विशाखापट्टणम् आणि पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश
पिंपरी ( महा ई न्यूज ) – ‘नॅशनल अर्बन लिडरशीप प्रोग्राम’ उपक्रमात देशातून दोन शहराची निवड करण्यात आली. यामध्ये पिंपरी-चिंचवड आणि विशाखापट्टणम् समावेश आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध योजना, संकल्पना, धोरणे ही सातत्याने ‘नाविण्यपुर्ण’ असतात. त्या सर्व कल्पना ‘डिजीटल व्यासपीठ’ मांडल्या जाणार आहे. त्या इनोव्हेशन आयडियांचा देशभरातील अन्य शहरात राबविण्यासाठी निश्चित फायदा होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिका-यांनी केलेल्या कष्टांचे चीज होवून शहराचे नाव देशपातळीवर होणार आहे.
केंद्र शासनाच्या नागरी विकास विभागाकडून सतत विविध उपक्रम राबविले जातात. त्यानूसार ‘नॅशनल अर्बन लिडरशीप प्रोग्राम’ हाती घेतला आहे. या उपक्रमातून महानगरपालिकेने विविध बनविलेली धोरणे, प्रकल्प व योजनांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या असतात. त्या नाविण्यपूर्ण संकल्पना नागरिकांना निश्चित फायदा होतो. त्या संकल्पना देशभरातील अन्य शहरातील स्थानिक स्वराज संस्थानी राबवाव्यात, त्यांनी तेथील नागरिकांच्या अनुषंगाने प्रत्यक्षात आणाव्यात. म्हणून केंद्र शासनाने हे एनयुएलपी हे नवे ‘डिजीटल व्यासपीठ’ तयार केले आहे.
त्यात पिंपरी-चिंचवड आणि विशाखापट्टण शहराचा समावेश करण्यात आला आहे.
या संदर्भात मंगळवारी (दि.7) महानगरपालिकेत कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी आयुक्त संतोष पाटील होते.
डिजीटल व्यासपीठाचे सल्लागार आनंद राज यांनी महापालिकेच्या अधिकार्यांना मार्गदर्शन केले. महापालिका योजना व प्रकल्पासाठी राबविलेल्या नव्या संकल्पनाचे व्हिडिओ, छायाचित्र, माहितीपत्रक या व्यासपीठावर अपलोड केले जाणार आहेत. तसेच शहरातील विविध योजनांना राष्ट्रीय पातळीवर धोरणांमध्ये विचारात घेणार आहेत. या योजनेसाठी सदस्य म्हणून पालिकेच्या दोन अधिकार्यांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमात निवड झाल्याने शहराच्या नावलौकीकात निश्चित भर पडली आहे.





