जनतेने भाजपाला धडा शिकवला: सचिन पायलट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/sachin-pilot.jpg)
राजस्थानमध्ये काँग्रेसची बहुमताने सत्ता येईल. मागील वेळी आमच्याकडे फक्त २१ जागा होत्या. यावेळी जनतेने भाजपाला धडा शिकवला आहे. भाजपा सरकारविरोधात लोकांना राग होता. काँग्रेसकडून लोकांना अपेक्षा आहेत. राहुल गांधी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील, असे राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सचिन पायलट माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, राजस्थानमधील काँग्रेसचा विजय ही राहुल गांधींना भेट आहे. कारण गेल्या वर्षी याच दिवशी त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली होती.
वसुंधरा राजें सरकारविरोधात जनतेचा रोष होता. मतदानातून तो बाहेर पडला आहे. लोकांना आता काँग्रेसकडून अपेक्षा आहेत. अंतिम निकालापर्यंत वाट पाहू. उद्या पक्षाची बैठक आहे. नवनिर्वाचित आमदार आपला नेता ठरवतील. काही जण आमच्या संपर्कात आहेत आम्ही काही लोकांच्या संपर्कात आहेत. आमचे सरकार बहुमताने सत्तेवर येईल. त्याचबरोबर राजस्थानसह तीन राज्यात आमचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मी इतर पक्षांच्याही संपर्कात आहे. फोडाफोडीचे भाजपाने राजकारण करु नये, असेही त्यांनी म्हटले.