breaking-newsआंतरराष्टीय
जगभरात आतापर्यंत कोरोनाचे 8 लाख 29 हजार 666 बळी
![Corona's cry again across the country! 459 people lost their lives in 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/corona-4th-death_202003390172.jpg)
कोरोना व्हायरसने गेल्या सहा-सात महिन्यात अवघ्या जगात थैमान घातले असून जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2 कोटी 43 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. तर 8 लाख 29 हजार 666 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या प्रसाराची सुरुवात ही चीनमधून झाली होती. मात्र चीनमध्ये सध्या कोरोना आटोक्यात आला आहे. जगभरातील 10 देशांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. यामध्ये अमेरिका, ब्राझिल, भारत, रशिया, दक्षिण अफ्रिका, पेरू, मॅक्सिको, कोलंबिया, स्पेन आणि चिली या देशांचा समावेश आहे. दरम्यान, जगभरात कोरोनाची लस मिळविण्यासाठी विविध देशांच्या सरकारची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे कोरोनावर लस कधी येणार, याकडेच सर्वांचेच लक्ष लागले आहे.