Breaking-newsआंतरराष्ट्रीय

चॉकलेटने भरलेला ट्रक रस्त्यावर उलटला

वॉशिंग्टन : रस्त्यावरील अपघातात केमिकल गॅस अथवा इतर कोणत्या पदार्थांनी भरलेला ट्रक उलटल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र लिक्विड चॉकलेटने भरलेला ट्रक रस्त्यावर उलटल्याची घटना पोलंडमध्ये घडली. रिपोर्टनुसार सिक्स लेनवरील या रोडवर लिक्विड चॉकलेट वाहून नेणारा ट्रक उलटला आणि ट्रॅफिक जाम झाली. अधिकाऱ्यांच्या मते, लिक्विड चॉकलेट संपूर्ण रस्त्यावर पसरले. काही वेळानंतर हे चॉकलेट घट्ट होऊ लागले. ते इतके घट्ट झाले की ते वितळवण्यासाठी हजारो टनची गरम पाण्याची गरज पडली.

थंड झालेले चॉकलेट हे बर्फापेक्षाही कडक असते. ही घटना सकाळच्या सुमारास घडली. यावेळी रस्त्यावर ट्रॅफिक जाम होते. दरम्यान या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. ड्रायव्हरला थोडी दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत वाया गेलेले चॉकलेट हे लाखो डॉलरचे असू शकते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button