Breaking-newsराष्ट्रिय
खासगी शिकाऊ विमान कोसळले; जीवितहानी नाही

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात एक खासगी शिकाऊ विमान कोसळल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यातील शंकरपल्ली तालुक्याच्या मोकिला गावात ही दुर्घटना घडली. शिकाऊ पायलटने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे छोटे विमान झेलकावे घेत एका शेतात कोसळले. दरम्यान, विमानातील पायलट सुरक्षित आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, राजीव गांधी एव्हिएशन अकॅडमीचा ट्रेनी पायलट भास्कर भूषण (वय २५) याने या विमानाचे उड्डाण केले होते. उड्डाणानंतर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळले. सुदैवाने पायलट तरुण यातून बचावला आहे.






